संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावातील आग्रेवाडी व मराठवाडी शिवसेना (उबाठा) गटाला दणका; आ. शेखर निकम यांना साथ देत ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
विश्वासाने साथ देत आत्मविश्वासाने पक्षाचे काम करा, सदैव प्रवेशकर्त्यांच्या स्वागतासाठी तत्पर असेन - आ. शेखर निकम

चिपळूण – संगमेश्वर मतदार संघातील हरपुडे गावातील आग्रेवाडी व मराठवाडी शिवसेना (उबाठा) गटाच्या लोकांचा पक्षप्रवेश कार्यक्रम जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे पार पडला. यावेळी कार्यालयात एकच जल्लोष झाला “आपला माणूस, आपला आमदार”, “शेखर सर आगे बडो हम तुम्हारे साथ है” या प्रवेशकर्त्यांचा उत्साह पहाताना सरांनी केलेल्या जनसेवेची, विकास कामांची, त्यांच्या कामाच्या पद्धतीची अन त्यांच्यावर लोकांच्या असणा-या प्रेमाची एक वेगळीच प्रचिती सद्या जनतेमध्ये दिसत आहे.
आमदार शेखर निकम यांनी मागील चार वर्षात सर्वच क्षेत्रात तसेच विविध योजनेंर्तगत अल्प कालावधीत रेकॉर्ड ब्रेक करत साडे तीनशे कोटी पेक्षा जास्तीचा निधी मंजूर करुन आणला आहे व नियोजनबद्ध खर्च करुन गावा-गावाचा विकास करत एक आदर्शवत नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन हरपुडे गावातील आग्रेवाडी व मराठवाडी शिवसेना (उबाठा) गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश केला.
या प्रवेश कर्त्यामध्ये आग्रेवाडी येथील मनोहर आग्रे (वाडी गावकर), राजाराम आग्रे (वाडी अध्यक्ष), अपर्णा आग्रे (महिलाध्यक्ष), आत्माराम पावसकर, रामचंद्र आग्रे, राजेश आग्रे, हर्षल आग्रे, दिलीप आग्रे, रामकृष्ण आग्रे, कृष्णा आग्रे, दिलीप आग्रे, शारदा आग्रे, वनिता आग्रे, अनिता पावस्कर, मयुरी आग्रे, प्रभावती आग्रे, सुलोचना आग्रे, दिक्षिता आग्रे, वैष्णवी आग्रे, सुवर्णा आग्रे, प्राची करंबेळे तसेच
मराठवाडीतील अजित शिंदे, सुरेश किर्वे, अनंत शिंदे, सुजाता किर्वे या लोकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
आमदार शेखर निकम म्हणाले हरपुडे गाव आणि माझे ऋणानुबंध फार जुने आहेत. गावातील विकास कामे करताना गटा-तटाचे राजकारण व पक्ष पाहिलेला नाही. जस ग्रामस्थांनी अडचणी सांगितल्या तस तसे तेथील अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही अडचणी सोडवण्यास व विकास कामे करण्यास कटीबद्ध असेन, फक्त आपली कायमची साथ अन सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास ढळू देवू नका.
या थोडक्याशा काळात रुपये सवातीन कोटीचा निधी आणून नियोजित पद्धतीने मतदार संघाचा विकास करण्याचे धाडस केले आहे. हे सर्व आपल्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे शक्य झाले आहे. काही कामे झाली नसतील, दुर्लक्षीत राहिली असतील ती आपण पुढील काळात पुर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन आपण सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलात त्याबद्दल तुमचे मन:पुर्वक स्वागत.
आता सर्वानी एकमेकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना बळकट करा व राष्ट्र्वादी काँग्रेस पक्ष आप-आपल्या विभागात कसा वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहा. विकासात्मक निधीची तुम्ही चिंता करु नका ती जबाबदारी मी स्विकारली आहे हा शब्द आमदार निकम यांनी विश्वासाने ग्रामस्थांना दिला. समाजकार्य, राजकारण करताना मात्र आपल्या कुंटुंबाकडे दुर्लक्ष करु नका यामध्ये कुंटुंबाची आर्थिक, मुलांची शैक्षणिक या गोष्टीत सक्षम रहा असा “मोलाचा संदेश” दिला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबूशेठ साळवी, सरपंच उस्मान सय्यद, नितीन भोसले, मंगेश बांडागळे, बाळशेठ पंदेरे, अमित जाधव, बंधु सुर्वे, जितेंद्र नलावडे, मंगेश कदम, अजय साबळे, इ. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



