डोंगरी पोलिसांची कारवाई ४ कोटी ७० लाखांचे कोकेन जप्त; मुंबई परीमंडळ १ उपायुक्त डॅा.प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कुख्यात आरोपी फैजल जावेद खान ला बेड्या.
आरोपी फैजल जावेद खान उर्फ याच्यावर १४ गुन्ह्यांची नोंद

मुंबई – डोंगरी पोलीस ठाणाच्या हद्दीत संशयास्पद मोटारसायकलस्वाराची झडती घेतली असता ४ कोटी ७० लाख रुपये किमतीचे कोकेन आढळून आले होते. सदर प्रकरणातील मुख्य फरार आरोपी फैजल जावेद खान याला मुंबई परीमंडळ १ चे उपायुक्त डॅा.प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखी डोंगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांच्या पथकाने राजस्थानमधील रामगंजमंडी, पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली आहे.
दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी इम्रान याकुब शेख, उर्फ जुम्मा, वय ४५ वर्षे, रा.ठि. रूम नं ०६,३ रा माळा, रज्जाक बिल्डिंग, सिद्धी मोहल्ला, डोंगरी, मुंबई हा सुपारीवाला बिल्डींगच्या समोर, निशानपाडा क्रॅास लेन, डोंगरी, मुंबई येथे मोटार सायकल क्रमांक एम.एच ०१ डीएल ७९७२ सह संशयास्पद रित्या दिसून आल्याने पोलीस पथकाने पंचासमक्ष नमूद इसमाची व त्यांचे मोटार सायकलची झडती घेतली असता त्याच्याकडे ९४० ग्रॅम वजनाचा कोकेन ( अंदाजे किंमत ४,३०,००,०००/- रुपये) हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अंमली पदार्थ मिळून आला. सदरचा मुद्देमाल पंचनाम्या अंतर्गत घटनास्थळी सीलबंद करून नमूद इसमास पुढील कारवाई कामी पोलीस ठाणेस आणून इसमा विरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हा नोद ४९६/२४ कलम – ८ (क) सह २१ (क), एन.डी.पी.एस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे फैजल जावेद खान, वय -३५ वर्षे हा दिनांक १६/१२/२०२४ रोजी पळून गेला होता. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी राज्य राजस्थान येथे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांच्यासह पो उप निरीक्षक पठाण, पोशिक्र. ११३४९२/पाटील, पोशिक्र १४११२२/सुरवाडे, पोशिक्र. १४१०८६/मुल्ला हे वरिष्ठांच्या आदेशाने राजस्थान येथे रवाना झाले होते. सदर ठिकाणी तपास करत असताना डॉ.प्रवीण मुंढे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०१, मुंबई, तन्वीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंगरी विभाग, मुंबई,जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंगरी पोलीस स्टेशन मुंबई, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कोथमीरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक परिमल पाटील, पोलीस उपनिरीक्षक वसीम पटेल, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक गोविंद फड यांनी पुरविलेल्या तांत्रिक मदतीच्या साहाय्याने राजस्थान येथे आरोपी नामे फैजल जावेद शेख याचा राजस्थान येथे ८ अंश सेल्शिअस तापमान असतानाही तीन दिवस दिवसरात्र शोध घेतला, परंतु आरोपी हा वारंवार त्याचे स्थान बदलत असल्याने मिळून येत नव्हता. अखेर ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११:४५ वा. च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांच्या सोबत असलेल्या पथकाने सापळा रचून आरोपी फैजल शेख यास चालत्या गाडीतून पकडून ताब्यात घेतला व नजीकचे पोलीस ठाणे रामगंजमंडी, जि. कोटा, रा. राजस्थान येथे आणून अटक करण्यात आली. सदर आरोपीस पुढील तपासकामी दि. ३१/१२/२०२४ रोजी डोंगरी पोलीस स्टेशन, मुंबई येथे आणण्यात आले. सदरचा आरोपी हा कुख्यात आरोपी असून त्याच्यावर या आधी अशाप्रकारच्या १४ गुन्ह्यांची नोंद आहे.



