नागपूरला सर्वात सुरक्षित शहर बनविण्यासाठी गृहविभागाचा कृती आराखडा ; गृह विभागाचा अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी घेतला आढावा

नागपूर : या आठवड्याच्या सुरुवातीला नागपूर दौऱ्यादरम्यान अपर मुख्य सचिव (गृह), महाराष्ट्र शासन श्रीमती मनीषा पाटणकर–म्हैसकर यांनी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. यावेळी नागपूरला सर्वात सुरक्षित शहर बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीला पोलीस नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हे शाखा उपायुक्त श्री.अग्रवाल,उपायुक्त श्रीमती अन्नपूर्णा सिंग, परिमंडळ ५ चे उपायुक्त नित्यानंद झा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महिला व बालकांची सुरक्षा, ‘अंमली पदार्थ मुक्त नागपूर’, ‘सायबर सुरक्षित नागपूर’ आणि ‘सुरक्षित नागपूर शहर’ या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून कार्य करावे, अशा सूचना श्रीमती मनीषा पाटणकर–म्हैसकर यांनी यावेळी दिल्या.



