आपला जिल्हा

कुचांबे येथील महिपत दुडे यांच्या घरावर दरड कोसळली ; स्थानिक कार्यकर्त्यांकडून दरडग्रस्त घरांची पाहणी

संगमेश्वर – तालुक्यातील कुचांबे कोंडभैरव येथील महिपत दुडे यांच्या घरावर दरड कोसळली आहे. त्यांच्यासहीत तीन घरातील कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढले असून कुचांबे येथील दुडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुचांबे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम काजवे, काशीराम लाखन माझी पोलीस दुडे, चंद्रकांत कदम, आत्माराम भोमकर, दिनेश राक्षे, सुहास पंडव, तुकाराम बागवे, सुनील लाखन यांनी दरडग्रस्त घरांची पाहणी केली. या ठिकाणी एकूण तीन घरांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button