पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचा अवैध धंदयांना चाप ! देवरुख पोलीसांनी मुर्शी चेकपोस्ट येथे गोवंश वाहतूक करणारी बोलेरो गाडी पकडली
पोलीसांनी दोन बैलांची केली सुटका; ३ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

देवरूख – संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पोलीसांनी मुर्शी चेकपोस्ट येथे गोवंश वाहतूक करणारी बोलेरो पकडली असून दोन बैल व बोलेरो मिळून ३ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. तर गोवंश वाहतूक करणाऱ्या एका इसमावर केली कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. देवरूख पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
याबाबत देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.३५ वा. देवरुख पोलीस ठाण्याच्या साखरपा पोलीस दूरक्षेत्रांतर्गत मुर्शी चेकपोस्ट येथे नियमित गस्ती करत असताना एक संशयित बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-08-M-4929) दिसून आले. वाहनाची अधिक तपासणी केली असता, त्यामध्ये दोन बैल बांधलेले आढळले. सखोल चौकशीत, वाहन चालक सागर नामदेव पाटील आणि इतर दोन्ही आरोपींनी गोवंश जनावरे अवैधपणे वाहतूक करत असलेची माहिती समोर आली. त्यांना वेदना होऊ नयेत म्हणून दोन्ही बैल ताडपत्रीने बंदिस्त केले होते, तसेच गुरांची वैद्यकीय तपासणी न करता त्यांना वाहतूक केली जात होती. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, 1976, प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, मोटार वाहन कायदा 1988, तसेच अन्य संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
या वाहनावरील चालकाची तसेच इतर इसमांची अधिक चौकशी केली असता संशयित सागर नामदेव पाटील याने आपल्या ताब्यातील बोलेरो पिकपमध्ये दोन गोवंश जनावरे वाहनात हालचाल करता येणार नाही व त्यांना वेदना होतील अशा प्रकारे आखूड दोरीने मानेला बांधून गाडीचा हौदा चारही बाजूने ताडपत्रीने बंदिस्त करुन अवैध पद्धतीने वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चालकसह सध्या गाडीचा वापर करणारा प्रदीप अरुण लाटवडेकर रा. पिशवी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर व बैल मालक आरोपी नागेश कदम रा. देवरुख बौद्धवाडी यांच्या सांगण्यावरुन ही दोन्ही गुरे कत्तल करण्यासाठी गैर कायदा बिगर परवाना अवैधपणे वाहतूक करून साखरपा पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत मूर्थि चेकपोस्ट येथून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावर देवरुख पोलीस ठाणे येथे गुन्हा.
रजिस्टर नंबर 66/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5 (अ), 5 (ब) व 9 सह प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1), (घ), (ङ), (च) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, 3/181 प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47,48,49,50,51,54,56 भा. न्या. सं 2023 चे कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये ₹ 3,50,000/- किमतीची एक सफेद रंगाची महिद्रा बोलेरो पिकअप गाडी, 2) ₹13,000/- किमतीचा एक बैल 3) ₹10,000/- किमतीचा एक बैल असा मिळून 3,73,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच गोवंश बैलांची सुटका करण्यात आलेली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे आणि देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेली.



