आपला जिल्हा
मुंबई – गोवा हायवेचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा पुन्हा एकदा ग्रामस्थांना फटका

संगमेश्वर – दि.१५ जून २०२५ रोजी मुंबई – गोवा महामार्ग संगमेश्वर येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या मोरी मध्ये हायवेवरील मातीचा भराव टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः पाणी शेजारील दोन घरात घुसले. श्री जयेंद्र दत्ताराम सुर्वे व राजेंद्र अनंत बिरजे यांच्या घरात पाणी शिरले व त्यांचे खूप नुकसान झाले
त्यांनी संगमेश्वर सरपंच विवेक शेरे यांना बोलावून स्थिती दाखवण्यात आली त्यांनी संबंधित हायवेचा ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला तरी सुद्धा हायवेच्या ठेकेदारांनी दुर्लक्ष केले म्हणून वरील ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलिसांना कळवले आहे.
येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



