आपला जिल्हा
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण भरले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

संगमेश्वर – तालुक्यातील गडनदी धरण पुर्ण क्षमतेने भरले धरणाची पाणीपातळी १२१.८० मिटर एवढी आहे. ६६.३८७ एवढा उप पाणीसाठा असून धरणात सध्या एकूण पाणीसाठा ६६. ६९९ द.ल.घ. मी एवढा आहे. गडनदी धरण क्षेत्रात २० जुलै रोजी ६७ मि.मी एवढा पाऊस पडला असून धरण क्षेत्रात एकूण पाऊस १३७७ मि.मी एवढा झाला आहे.
गडनदी धरण भरुन वाहू लागल्याने नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदी किनारी गावांना सतर्कतेच्या सुचना जारी केल्या आहेत पावसाचा जोर वाढल्यास शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वत सह जनावरांची काळजी घेण्याचे आव्हाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतक-यांना वरदान ठरु पाहत आहे धरणात क्षमतापुर्ण पाणीसाठा सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
सध्य पावसाला जोर आहे गडनदी धरण पहायला जाणा-यांनी धरणात उतरु नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये नाकरीकांनी आपली खबरदारी घ्यावी असे आव्हाहन गडनदी मध्यम प्रकल्प उप विभागीय अभियंता श्री. इनामदार यांनी केले आहे.



