आपला जिल्हा

गट विकास अधिकाऱ्यांच्या मूळ दस्तऐवजात फेरफार केल्याबद्दल राजीवली सरपंच सौ प्रगती शिर्के यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा!

संतोष येडगे व येडगे वाडी ग्रामस्थांची मागणी

देवरुख – संगमेश्वर पंचायत समिती च्या गट विकास अधिकाऱ्यांच्या मूळ दस्तऐवजात फेरफार केल्याबद्दल राजीवली सरपंच सौ प्रगती शिर्के यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून उचित कारवाई करण्याची मागणी कुटगिरी येडगे वाडीतील श्री संतोष येडगे व इतर ग्रामस्थानी लेखी अर्जाद्वारे गट विकास अधिकाऱ्यांकडे केली असून याची एक प्रत संगमेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात ग्रामस्थानी म्हटले आहे कीं…

“आम्ही कुटगिरी येडगेवाडी येथील ग्रामस्थ आपणांस विनंती करतो आमच्या गावातील श्री. यशवंत गोविंद येडगे यांनी आपल्याकडे नळ कनेक्शन तोडल्याबाबत दि.१७ एप्रिल २०२६ रोजी अर्ज केला होता या अर्जानुसार आपल्या कार्यालयात दि. १ जुलै २०२६ रोजी अपील सुनावणी घेणेबाबत येडगेवाडीतील दोन्ही गटातील ग्रामस्थांना हजर राहणेबाबत जा.क्र / पंससं / वि.अ / सुनावणी / ३२३३ / २५.२६ / दि. ३० जून २०२६ रोजी नोटीस बजावली होती या मुळ नोटीस ( दस्तऐवज) मध्ये यशवंत गोविंद येडगे, शंकर भागोजी येडगे, अनंत सखाराम येडगे, गणपत जानू येडगे, बाबू गोविंद येडगे, धोंडीबा जानू येडगे, बारकू जानू येडगे रा. कुटगिरी येडगेवाडी यांना
अधिकृत नोटीस बजावण्यात आली होती मात्र गटविकास अधिकारी (गट अ) च्या महत्वाच्या मुळ नोटीस
(दस्तऐवज ) मध्ये ग्रामपंचायत स्तरावर सरपंच प्रगती प्रशांत शिर्के यांनी स्वतः मनमानी करत त्यात बदल करत अन्य नावे सामाविष्ट केलेली निदर्शनास आली आहेत”.

“या मुळ नोटीस मध्ये नसलेली विठ्ठल जानू येडगे, ज्ञानेश बाबू येडगे,रामचंद्र कोंडीबा येडगे, बाबू कोंडीबा येडगे, नामदेव कोंडीबा येडगे, बारकू बिरु येडगे, हरीचंद्र बळीराम येडगे ही नावे
अतिरिक्त पेनच्या सहाय्याने लिहून मुळ दस्तऐवजात बदल करून शासन तसेच ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात आली आहे”.

“सरपंच पदासारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने गटविकास अधिकाऱ्यांच्या मुळ दस्तऐवजात बदल करणे हा गंभीर गुन्हा आहे. शासनाची तसेच ग्रामस्थाची दिशाभूल करत फसवणूक केल्याप्रकरणी सरपंच सौ. प्रगती प्रशांत शिर्के यांच्यावर बीएनएस ३३५, बीएनएस ३३६ कलमानुसार तातडीने गुन्हा दाखल करुन कारवाई करावी ही विनंती आहे”

Related Articles

Leave a Reply

Back to top button