आपला जिल्हा

गड आला पण सिंह गेला ; पितृछत्र हरपलेल्या प्रियांका बावदाने ची मुंबई पोलीस दलात निवड.

मुंबई – मुळ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नांदळज धनगरवाडीतील कन्या प्रियांका सुमन प्रकाश बावदाने हिची मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी निवड झाली आहे. मुंबई पोलिस भरतीच्या २७ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या निवड यादीत प्रियांकाचे नाव आले आणि सर्वांनाच आनंद झाला मात्र यावेळी आनंद व्यक्त करण्यासाठी तिचे वडील मात्र हयात नव्हते त्यामुळे गड सर केलेल्या लेकीचे यश पाहण्यासाठी सिंह हरपल्याची भावना जाणवत होती.

प्रियांका बावदाने ही ५ मार्च २०२२ पासून पोलिस भरतीत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होती. तीचे सातत्यपुर्ण प्रयत्न सुरु होते. मागील दोन भरतीत ती प्रतिक्षा यादीपर्यंत पोहोचली होती मात्र तिची अंतिम निवड झाली नव्हती यावेळी तीने आरक्षणात १२४ मार्क मिळवून मुंबई शहरातील ३७ मुलींमधून ८ क्रमांक मिळवत आपले स्थान निश्चित केले.

प्रियांका बावदाने हीचे वडील प्रकाश बावदाने हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांना कावीळ सारखा आजार झाला होता प्रथम त्यांच्यावर घाटकोपर, मुंबई व त्यानंतर पुणे याठिकाणी उपचार करण्यात आले मात्र १४ मे २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रियांका बावदाने या वेकीची निवड पहावी असे त्यांचे स्वप्न होते मात्र १४ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि २७ मे २०२६ रोजी मुंबई पोलीस भरती निवड यादी प्रसिद्ध झाली. प्रतीकुल परीस्थितीवर मात करत वडीलांच्या आजारपणाच्या काळात घरची जबाबदारी सांभाळून प्रथम मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा देत प्रियांकाने यश मिळवले. प्रियांकाच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. सर्वच स्तरावर तीचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button