आपला जिल्हा

संगमेश्वर पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने अखेर त्या घराच्या चाव्या महिलेच्या ताब्यात

संगमेश्वर – तालुक्यातील शिवणे गावातील एका घराच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले असून, संगमेश्वर पोलिसांच्या आदेशानंतरही संबंधित महिलेला घराचा ताबा देण्यात टाळाटाळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने दखल घेत संबंधित पोलिस पाटलाची चांगलीच हजेरी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अखेर संबंधित महिलेला घराचा ताबा पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मध्यस्थीने महिलेला देण्यात आला

या प्रकरणात संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले जात आहे. तसेच या घराच्या ताब्यामागे आर्थिक व्यवहार असल्याची बाबही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवणे गावातील स्मिता जुवेकर यांच्या भावाने काही वर्षांपूर्वी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. त्यावेळी गावचे पोलिस पाटील मनोज शिंदे हे जामीनदार होते. दरम्यान, स्मिता जुवेकर यांच्या भावाचे निधन झाल्यानंतर संबंधित कर्ज आणि आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून मनोज शिंदे यांनी घराचा ताबा स्वतःकडे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपा नंतर संबंधित महिलेला पुन्हा घराचा ताबा मिळाल्याने तात्पुरता वाद निवळला असला, तरी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कर्जाची प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींबाबत पुढील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button