नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना लगाम घालावी ; एपीएमसी चाकू हल्ल्यातील आरोपी मोकाट.

नवी मुंबई – एपीएमसी मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ अज्ञात कारणावरून सुरेश बाबू येडगे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना २५ मार्च २०२६ रोजी घडली होती. या प्रकरणी एपीएमसी मार्केट पोलीस ठाण्यात एकूण ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमधील एका आरोपीवर खूनाचा प्रयत्न, गोळीबार, अपहरण आदी कलमानुसार विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असून सुरेश येडगे यांच्या चाकू हल्ला प्रकरणात या आरोपीचे नाव आले आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात २५ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यातील आरोपी मोकाट असून नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी रेकॉर्डवरील आरोपींना लगाम घालण्याची वेळ आली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित असताना या प्रकरणातील आरोपी मोकाटच फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश बाबू येडगे (वय ३६, रा.धोबीतलाव मुंबई,हे २५ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास तुर्भे नवी मुंबई या येथील भीशी चा हिशेब आटोपून अमृत बार या ठिकाणी बसले होते त्यावेळी अक्षय शंकर येडगे यांनी तुर्भे येथील सुदर्शन लांडगे व इतर साथीदारांसोबत आपले काका असल्याची त्यांच्यासोबत ओळख करु दिली.त्या ठिकाणी तुकाराम बबन येडगे, संतोष विलास येडगे, कृष्णा धोंडू येडगे हे एकत्रित बसले असता त्या ठिकाणी रमेश भामोजी येडगे कोणीही न बोलवताच तिथे आला होता त्यादरम्यान तुकाराम बबन येडगे आणि रमेश भागोजी येडगे यांच्यात जुन्या वादातून शाब्दिक बाचाबाची झाली ती बाचाबाची थांबून सुरेश येडगे, संतोष विलास येडगे व कृष्णा धोंडू येडगे हे आपल्या घराकडे निघून जाण्यासाठी सानपाडा येथे गेले असता त्यांना नामदेव राजाराम येडगे यांनी भांडणे मिटवायची असल्याचे कारण सांगून बोलावून घेतले. सुरेश, संतोष व कृष्णा हे तिघेही अमृत बार जवळ आले असता अनंत रामचंद्र येडगे यांच्या सांगण्यावरून सुदर्शन लांडगे, नामदेव राजाराम येडगे, रामाचंद्र यशवंत येडगे,अक्षय शंकर येडगे, कृष्णा धोंडीबा येडगे ( तुर्भे ) व त्यांच्या इतर साथीदारांनी सुरेश येडगे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला होता.
सुरेश येडगे यांच्या फिर्यादीत नमुद असलेल्या माहितीनुसार अनंतर रामचंद्र येडगे व अक्षय शंकर येडगे यांच्या सांगण्यावरून दि.१७ एप्रिल २०२६ रोजी काही मारेकरी सुरेश येडगे यांच्या धोबीतलाव मुंबई येथील घरी सुरेश येडगे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गेले होते. ते धोबीतलाव या ठिकाणी जावून सुरेश येडगे कुठे राहतो त्याला ठार मारण्याची आम्हाला सुपारी दिली असल्याचे त्यातील एका आरोपीने सांगितल्याचे सुरेश येडगे यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे त्यानुसार सुरेश येडगे यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेनंतर सुरेश येडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध विविध बी.एन.एस. कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन टेकनार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई तुर्भे परिसरात सध्या कमी वयातील युवकांना गुन्हेगारीकडे वळवण्यात येत आहे. रेकॅार्जवरील गुन्हेगार या किशोरवयीन मुलांना गुन्हेगारीचा आदर्श दाखवून गुन्हेगारीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे.या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी स्वत ळक्ष घालून समाजातील गुन्हेगारीची दहशत मोडीत काढण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.



