श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुणे नगरीत महानगरपालिकेकडून स्वागत ; पालखी सोहळ्यात सामील होत महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले स्वागत

पुणे – श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे स्वागत पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी.(ई), अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) एम. जे.प्रदीप चंद्रन त्याचबरोबर उपायुक्त परिमंडळ क्र.१ श्री. माधव जगताप, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदीप कदम , मुख्य अभियंता (प्रकल्प) युवराज देशमुख आदींनी स्वागत केले.

तसेच श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) श्री.ओमप्रकाश दिवटे यांनी केले.
यावेळी उपायुक्त परिमंडळ क्र.२ श्री.अरविंद माळी, मा.महापालिका सहाय्यक आयुक्त श्री.गिरीश दापकेकर आदींनी स्वागत केले. यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे श्री.ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी सारथ्य केले.
सर्व दिंड्यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने जयत तयारी केलेली होती यामध्ये पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, त्याचबरोबर पालखी मार्गावरील स्वच्छता,आरोग्य सेवा इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती.
पालखी संदर्भातील अधिक माहितीसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE



