ताज्या घडामोडी

रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस तथा निकामी,भंगार वाहने तत्काळ निष्कासन करुन विल्हेवाट लावा – मुंबई महापालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी

मुंबई – मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस तथा निकामी,भंगार वाहनांचे बाह्य संस्था आणि प्रशासकीय विभागस्तरावरील प्रशासन यांनी तत्काळ निष्कासन करुन विल्हेवाट लावावी. तसेच, ‘बेवारस वाहनमुक्त,अडथळामुक्त रस्ते’साठी उत्तम प्रयत्नांसोबतच प्रसंगी कठोर कारवाईसुद्धा करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबईतील बेवारस तथा निकामी,भंगार वाहनांविरोधात अधिक तीव्रतेने आणि जलद पद्धतीने कारवाई करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर मे २०२५ पासून बाह्य संस्था नेमली आहे. संबंधित प्रशासकीय विभाग आणि बाह्य संस्था यांच्याद्वारे यासंदर्भात कारवाई सुरू आहे.

सुरू केलेल्या कारवाईचा आढावा, कारवाईदरम्यान येत असलेले अडथळे तथा उपाययोजनांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक पार पडली. त्यावेळी श्री. गगराणी यांनी हे निर्देश दिले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. अनिल कुंभारे, उपायुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे यांच्यासह विविध परिमंडळांचे उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) श्री. गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (वाहतूक) श्री. महेंद्र अग्रवाल आदी या बैठकीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button