आपला जिल्हा

राजिवली शिर्केवाडीतील विद्यार्थ्यांची एसटी बस अभावी परवड ; आमदारांच्या सूचनेनंतरही आगाराकडून एसटी बस सुरु करण्यास दिरंगाई

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली शिर्केवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना मुसळधार पावसातून वाट काढत पायपीट करत बस पकडावी लागत आहे. सध्या शाळा सुरु झाल्या आहेत. शिर्केवाडी येथील चिमुकले विद्यार्थी पायपीट करत असल्याची बाब संतोष येडगे यांनी दि.२१ जून २०२५ रोजी आमदार शेखर निकम यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.आमदार शेखर निकम यांनी शिर्केवाडी मार्गे बस सुरु करणेबाबत देवरुख आगारप्रमुखांना सूचना केल्या मात्र अद्याप एसटी बस सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुंभारखाणी माध्यमिक विद्यालय, कुंभारखाणी या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देवरुख आगारातून सकाळी ५.४५ व चिपळूण आगारातून सकाळी ७.३० वा सुटणा-या या दोन एसटी बस मधून विद्यार्थी शाळेला जातात तर देवरुख आगारातून दुपारी ३.४५ वा व चिपळूण आगारातून दुपारी ३.३० वा सुटणा-या वस्तीच्या बसमधून विद्यार्थी घरी येतात या सर्व एसटी बस शिर्केवाडी मार्गे जाव्यात अशी प्रमुख मागणी स्थानिकांची आहे.

आमदार शेखर निकम यांनी सूचना करुन ही एसटी बस सुरु करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी असा सूर आता स्थानिकांमधून उमटू लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button