
संगमेश्वर – शिक्षण हा उज्वल भविष्याचा पाया आहे, तरीही देशभरातील लाखो मुले मूलभूत शिक्षण शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात. तरुण मनांना घडवण्यात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका ओळखून, संगमेश्वर तालुक्यातील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते निखिल दळी यांनी करजुवे विद्यालय येथे २४० विद्यार्थ्यांना मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करुन एक पाऊल पुढे टाकले. या उपक्रमाचा उद्देश शिक्षणापासून व शैक्षणिक साहित्यपासून दुर असलेल्या विद्यार्थ्यांंमध्ये शिक्षणाची गोडी लागावी व साहित्यामुळे कोणीही वंचित राहू नये यासाठी हा छोटासा प्रयत्न केला गेला
दर्जेदार शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे मात्र दुर्दैवाने सामाजिक-आर्थिक अडथळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येत असतात यामुळे तो दूर राहतो शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि गरिबीचे चक्र कायम राहते. हि गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक निखिल दळी यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन मोफत शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले.सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वहि पेन आणि चॉकलेट आदि साहित्यांचे वाटप केले.
विद्यालयातील मुख्याध्यापक अशोक कुवळेकर यांनी निखिल दळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विद्यालयात स्वागत केले व त्यांच्या प्रती बोलताना मुख्याध्यापक कुवळेकर यांनी तुम्ही दिलेली मदत मुलांच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे आपण केलेली मदत मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा मुख्याध्यापक अशोक कुवळेकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला विद्यालयांतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.सन्मानाला दाद देताना युवा उद्योजक निखिल दळी यांनी सांगितले की माझा जन्म आणि माझे बालपण कोकणात झाले आहे त्यामुळे कोकणातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना काय करावे लागते याची मला जाणीव आहे. माझंही शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे
आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांनी खूप मोठी स्वप्न बघावी आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर आधी आपण खूप शिकायला पाहिजे त्यामुळेच आपण ते स्वप्न सत्यात उतरवू शकतो असे निखिल दळी यांनी सांगितले
कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक अशोक कुवळेकर ,रामराव बनसोडे ,सुनील केसरकर ,सुरज माने , प्रमोद स्वामी ,विठोबा धावडे ,संतोष कासारे ,विठ्ठल नलावडे ,पराग खैर, सुरेश कुंभार , किशोर धामापुरकर सूत्रसंचालन सच्चिदानंद शिर्के यांनी केले



