भारतीय जनगणनेत स्व- गणना प्रक्रीयेद्वारे आपली माहीती नोंदवावी ; मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांचे आवाहन

मुंबई – जनगणना २०२७ च्या स्व-गणना प्रक्रियेत (वने व भूसंपादन) महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी आपली माहिती संगणकाद्वारे (एसई) पोर्टलवर नोंदविली. यावेळी भारत सरकारच्या सहसचिव तथा राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीने ही जबाबदारी स्वीकारून मोठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडण्याचे आवाहन मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी केले. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना (एसई) पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ पर्यंत कार्यरत राहील.
राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणना २०२७ च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत एसई पोर्टलवर नोंदवून या देशव्यापी प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ. डांगे यांनी यावेळी केले.



