आपला जिल्हा

चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील ६५ टक्के समाजाने ३५ वर्षे बिगर कुणबी मतदान केले

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत कुणबी उमेदवारालाच प्राधान्य ; चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचा विश्वास

संगमेश्वर :- पुर्वीचा संगमेश्वर – लांजा आणि सध्याचा चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मागील ३५ वर्षात ६५ टक्के इतकी टक्केवारी असणा-या कुणबी समाजाने बिगर कुणबी उमेदवारांना मतदान केले मात्र आता २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत कुणबी उमेदवारालाच प्राधान्य मिळाले पाहीजे या मतदारसंघात कुणबी उमेदवाराचा विजय होणार असल्याचे ठाम मत संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेखर जोगळे,दिपक भेरे,सूरेश घडशी,यशवंत चांदे, सुनिल करंडे, शौर्य जोगळे,अनिल पेंढारी,संजय बडद,नदू भुवड, मंगेश मुडेकर,दिपक मांडवकर,व तालुक्यातील कुणबी समाजा च्या कार्यकर्त्यांनी मांडले आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत कुणबी समाजाला डावलल्यास कुणबी समाज आपली जागा दाखवून देईल आणि 35 वर्षातील राजकीय परीवर्तन घडवून दाखवेल असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेखर जोगळे, संदीप धावडे व दिपक भेरे यांनी यावेळी म्हणाले.

संगमेश्वर – चिपळूण विधानसभा मतदारसंघात सहदेव बेटकर हे कुणबी समाजातील प्रभावी नेतृत्व आहे.चिपळूण – संगमेश्वर विघानसभा मतदारसंघात समाजात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यांचे काम तळागाळातील वाड्या वस्त्यापर्यंत पोहचलेले आहे. समाजातील युवा वर्गात सहदेव बेटकर यांच्याबद्दल आदर असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सहदेव बेटकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून कुणबी समाज आग्रही आहे.समाजाच्या आग्रहास्तव सहदेव बेटकर यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरु केली असून निवडून येण्याच्या निकषावर प्रयत्न सुरु केले असल्याचे शेखर जोगळे यांनी यावेळी सांगितले.

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत सहदेव बेटकर यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवली होती त्या वेळी भास्कर जाधव यांच्याविरोधात प्रचंड चुरस निर्माण झाली होती. सहदेव बेटकर गुहागर विधानसभा मतदारसंघात नवखे उमेदवार असून ही त्यांनी माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात ५२ हजार २९७ एवढी विक्रमी मते मिळवली होती. गुहागर विधानसभा निवडणूक निकालाची तुलना केली तर चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील समाजाची मतदानाची टक्केवारी आणि सहदेव बेटकर यांचा असलेला जनसंपर्क पाहता त्यांना अधिक यश मिळू शकते असा विश्वास समाजातील पदाधिका-यांना आहे.

  • गुहागर विधानसभा मतदारसंघातील २०१९ चा निवडणूक निकाल
  • भास्कर भाऊराव जाधव
  • एसएचएस
  • 78,748 मते
  • 26,451 आघाडी
  • 55.18% मते
  • बेटकर सहदेव देवजी
  • राष्ट्रवादी
  • ५२,२९७ मते
  • 36.65% मते
  • जाधव विकास यशवंत
  • वंचित बहुजन आघाडी
  • ५,०६९ मते

Related Articles

Leave a Reply

Back to top button