आपला जिल्हा

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ; संगमेश्वर तालुका धनगर समाजाच्यावतीने पुण्यातिथी साजरी

संगमेश्वर – तालुक्यातील जय मल्हार धनगर सेवा संस्थेच्या वतीने आज देवरुख येथील समाज भवनात आहील्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करत पदाधिका-यांनी त्यांना अभिवादन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम शेळके, उपाध्यक्ष विठोबा फोंडे, खजिनदार सुनिल बोडेकर, शांताराम शेळके, वैशाली अभीजीत शेळके आणि इतर महीला, पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी महाराणी’ म्हणून ओळखल्या जातात. भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button