मराठी रंगभूमीशी समरस होत जपला ४८ वर्षांचा नाट्यकलेचा वारसा ; संगमेश्वर परचुरी वेल्येवाडीतील कलाकारांची ऐतिहासिक नाटकांची परंपरा कायम
संगमेश्वर - सचिन यादव

संगमेश्वर :- कोकणच्या तांबड्या मातीला नेहमीच कलेचा स्पर्श लाभला आहे. इथल्या अनेक कलाकारांचा प्रवास हा गावात होणाऱ्या नाटका पासून ते मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटकांपर्यंत झाला .आज ही परंपरा खेडे गावात वाडी वस्तीवर स्थानिक कलाकार उत्स्फुर्त पणे तळमळीने जपत आहेत.अशीच परंपरा संगमेश्वर तालुक्यातील परचुरी वेल्येवाडीतील कलाकार व ग्रामस्थ गेले ४८ वर्षापासून जपत आहेत. या नवनिर्माण नाट्य मंडळाची स्थापना १९७६ ला मंदिरात झाली. सुरवातीला अनेक अडचणींचा व प्रसंगाचा सामना केला सुरवातीला काल्पनिक नाटकांच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपल्या अंगभूत कौशल्याने व संवादातून प्रेक्षकांचे हृदय जिंकले.यातूनच पुढे ऐतिहासिक नाटकांची ओढ लागली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक नाटकांना सुरवात झाली. आजहि या मंडळाने टिकवून ठेवली आहे. नाटकांच्या तालमीचा शुभारंभ देवदिवाळीच्या दिवशी सर्व मंडळाचे कार्यकर्ते व कलाकार एकत्र येऊन नव्या नाटकाच्या संहितेचे शुद्ध अंतःकरणाने श्रीफळ वाढवून पूजन करतात. दिवसभर आपले काम पूर्ण करून रात्री तालमीला हजेरी लावतात. महाशिवरात्री नंतर येणाऱ्या दर्श अमावस्येला सार्वजनिक पूजेच्या दिवशी रात्री रंगमंचावर या नाटकाचा प्रयोग सादर केला जातो. यावेळी रामगणेश गडकरी लिखित “राजीयांचे राजे” हा नाटकाचा प्रयोग संपन्न झाला. नाटक शिवछत्रपतींच्या जीवनावर असल्याने दर्जेदार व्हावे या साठी स्थानिक कलाकार दिग्दर्शक काशिनाथ वेल्ये यांच्या मार्गदर्शनाने आपला जीव ओतून काम करत होते. या नाटकाचे दिग्दर्शन काशिनाथ वेल्ये यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. आणि त्यांची भुमिका साकारण्याची संधी मला मंडळाने दिली तेव्हा अतिशय आनंद झाला. गेली ५-६ वर्षे मी छत्रपती शिवाजी राजांची भूमिका साकारीत आहे. छत्रपतींची भूमिका साकारत असताना मनावर दडपण होते त्यामुळे खूप मेहनत घेतली सरावासाठी प्रवास करुन जायचं
भूमिका साकारायची म्हणून तब्येत बारीक केली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान केला तेव्हा मन भरून आले.
– राजाराम गोणबरे
कलाकार



