खा. विनायक राऊतच्या नाकर्तेपणामुळे पाच वर्षे महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले
प्रमोद जठार यांचा घणाघात ; राजापूर एसटीडेपोसमोरिल कामातही खासदार व आमदाराचा खोडा

राजापूर – आपल्या मतदार संघाशी आणि मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नसलेल्या नतद्रष्ट आणि कर्मदरिद्री उबाठा गटाचा खासदार विनायक राऊत याच्या नाकर्तेपणामुळे आज जिल्हयात मुंबई गोवा महामार्गाचे काम पाच वर्षे रखडल्याचा घणाघात भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी केला आहे.
राजापूर एसटीडेपोसमोरील काम रखडवण्यास देखील खासदार विनायक राऊत व स्थानिक आमदार राजन साळवी हे दोघे जबाबदार असून त्यांच्यामुळेच आज या ठीकाणी सर्वसामान्य प्रवाशी जनता आणि वाहन चालकांची परवड होत असल्याचा आरोप जठार यांनी केला आहे. या ठीकाणी जर का अपघात होऊन कुणाचा जीव गेला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी या दोघांची राहिल असा ईशाराही जठार यांनी दिला आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी जिल्हयात अनेक ठिकाणी रखडल आहे. आज राजापूर एसटीडेपोरसमोरील कामही भुयारी मार्ग की सर्कल या चक्रात अडकेलेले आहे. याला सर्वस्वी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याचे जठार यांनी सांगितले. केंद्रात जनतेचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या भागातील जनतेला अपेक्षित असलेले काम आणि विकास करणे हे त्या लोकप्रतिनिधीचे काम आहे. मात्र आंम्हाला हा कर्मदरिद्री खासदार लाभल्याने आमची कामे रखडल्याचे जठार यांनी सांगितले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या, बदलांवर चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवली येथील ओव्हर ब्रीजही आंम्ही मागणी करून करून घेतला. पण हा खासदार चांगल्या कामांना विरोध करत राहिला, बैठकांमध्ये काहीच न बोलता केवळ विरोध करण्याचे काम या महाशयांनी केले. राजापुरातच काय रत्नागिरी जिल्हयात मागाल त्या ठीकाणी व गावात ओव्हर ब्रीज पासून सर्व सुविधा मिळाल्या असत्या, मात्र त्यातले यांनी काहीच केले नाही, कारण यांना जनतेशी काहीच देणंघेणं नाही असा घणाघात जठार यांनी केला.
राजापूर एसटीडेपोसमोरचा पुर्वीचा आराखडा या महाशयांनी बदलालया लावला. जनतेचा विरोध आहे अशी खोटी माहीती दिली. त्याचे परिणाम आज राजापूर वासीयांना भोगावे लागत आहेत. या ठीकाणी जर का अपघात झाला तर त्याला सर्वस्वी हा निष्क्रीय खासदार आणि स्थानिक आमदार जबाबदार राहतील असेही जठार यांनी नमुद केले. अनेक ठीकाणी ओव्हर ब्रीजची मागणी असताना व ना. गडकरी आवश्यक तो बदल करून निधी देत असतानाही या महाशयांनी ते न करता बॉक्सचे ब्रीज माथी मारले आणि आज गावांचे दोन भाग झाले.
खासदार म्हणून आपल्या भागातील जनतेल अपेक्षित असे काम करणे, त्यांच्या मागण्या पुर्ण करणे गरजेचे असताना ते त्यांनी केले नाही.
केंद्रीय वाहतुक मंत्री ना. गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण हे महामार्ग लवकर पुर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. तो लवकर पुर्ण होईल मात्र जनतेला खोटी माहिती देऊन महामार्ग रखडवणारे हे उबाठा गटाच खासदार आणि आमदार हेच झारीतील शुक्राचार्य असल्याची टिका जठार यांनी केली.



