महाराष्ट्र

राज्यातल्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या ना.शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातून जाणा-या “पाटण – चिपळूण महामार्गाची” दुरावस्था

पाटण – पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाला जोडणा-या कराड चिपळूण रस्त्यावर पाटण ते धक्का पर्यंत अक्षरशा रस्त्याची चाळण झाली असून अद्यापही ती कायमच आहे या रस्त्यावरचे खड्डे भरावे म्हणून विविध पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आले हे आंदोलन शांत व्हावे म्हणून या रस्ताला२१२कोटी ४९लाखाचा निधी मंजूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी गाजर दाखवत वेळ काढू पना केला आणि अधिकारी किती चतुर असतात हे  रस्त्यावर असलेल्या खड्ड्याच्या अनुषंगाने दिसून येते

गुहागर विजापूर हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र व कोकण ला जोडणारा व पाटण हे कोकणचे प्रवेशद्वार.असल्याने कोकणात जानारे प्रवासी मोठ्या प्रमाणात या राष्ट्रीय महामार्गावरून जा ये करीत असतात  त्यामुळे येथून वाहनांची वर्दळ वाढली आहे  सध्या पावसाळा असल्याने , अनेक ठिकाणावरून कोयनासारख्या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी येणारे पर्यटक यांचे स्वागत खड्ड्यातून होत असून, त्यांना कठीण प्रसंगाला तोंड देत प्रवास करावा लागत आहे. तर गणपतीचे स्वागत ही या रस्त्यावरून झाले आहे गणराया या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधीना रस्ता करण्याची लवकरात लवकर सद्बुद्धी दे असा गणरायातून आगमन करताना अनेक भाविकांच्या तोंडातून हे शब्द आपसूकच  उमटले पण या अधिकाऱ्यांना माणसाचे सोयर सुतक नाही तर देवाचे काय असणार असाही प्रश्न येतील भाविकांनी उपस्थित केला

या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कारणाने गेले कीतेक  वर्षापासुन रस्ताचा खेळखंडोबा झाला होता. काही महिन्यापुर्वी संगमनगर ते घाटमाथा रस्त्याचे नव्याने डांबरीकरण सुरू होऊन बहुतांशी काम पुर्ण झाल्याने वाहनचालकानी सुटकेचा निश्वास टाकला होता याच रस्तावर पाटण ते धक्का दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने  वाहनचालक व   प्रवाशांना  कसरत  व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोयना विभाग पावसाचे आगार असुन अद्याप या भागात पावसाचे प्रमाण अल्प आहे.अद्यापही मुसळधार पाऊस पडणार असुन संपुर्ण या रस्त्याची अवस्था बिकट होणार आहे. रस्ताच्या दुरावस्थेमुळे गेले कित्येक वर्षापासून या भागात  जास्त पाऊस असल्याचे हा रस्ता टिकत नसल्याचे कारण पुढे दामटत लोकप्रतिनिधींच्या बैठकीत  हो साहेब जी साहेब म्हणत अधिकारी आपली स्वतःची चामडी वाचवण्याचा प्रयत्न करतात मात्र हे रस्ते कायमस्वरूपी टिकावी म्हणून कोणताही मार्ग काढत नाहीत का तर त्यांना ठेकेदारांना पोसावे लागते  पाऊस सुरू झाल्यापासून अनेक वेळा हे खड्डे भरले मात्र निकृष्ट दर्जाचे खडीनि भरल्याने दुसऱ्याच दिवशी खड्डे पूर्वत्व होतात त्यामुळे नक्कीच अधिकारी व ठेकेदार यावरू यांच्यात साठे लोटे असल्याचे दिसून येते या खड्ड्यावरील खडी सर्व रस्त्यावर पसरलीआहे  येथून ये जाणाऱ्या प्रवाशांना खडी  तडकन उडून लागते त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा मोठमोठे अपघात झाले आहेत काही जणांना आपला जीव गमावा लागला तर काही काहीजण कायमचे अपंगत्व आले आहे मग अशा अधिकारी व ठेकेदारावरती मनुष्यबळीचा गुन्हा का दाखल केला जात नाही असा प्रश्न उपस्थित  होऊन त्यांच्यावर मनुष्यबळीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी वाहनधारक प्रवासी वर्गातून होत आहे

कोयना भागातील पंचायत समितीचे सदस्य. लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाच्या वतीने अनेकदा आंदोलनं,रास्ता रोको करावे लागले होते आत्ताही त्याच ठिकाणी मोठ मोठे  खड्डे पडले असून पुन्हा आंदोलन होण्याची प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी वाट पाहत आहेत का?असा सवाल नागरिक विचारत आहेत. तरी लवकरच महामार्ग विभाग व लोकप्रतिनिधीनी रस्ता वाहतुकीस योग्य व्हावा यासाठी प्रयत्न करावा व वाहन चालक प्रवाशांना सुरक्षित सुरळीत रस्ता उपलब्ध व्हावा एवढीच माफक अपेक्षा आहे

या रस्त्यावरुन मंत्री महोदय अनेक वेळा दौरा करत असतात .प्रशासकीय अधिकारी यांचे सह.इतर  महामार्गचेअधीकारी ही ये जा करीत असतात   पण त्यानी ही याची गंभीर दखल्ल घेतल्याची दिसत नाही विविध संघटनेच्या वतीने अंदोलन केले मात्र थातुरमातुर उत्तरे देवून वेळ काढूपणा केला जातो  त्या मुळे अधिका-यांसह लोकप्रतिनिधींबद्दल तिव्र संताप नागरिक आणि प्रवाशी वाहनधारकातून व्यक्त केला जात आहे 

या उर्वरित महामार्गासाठी २१२ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे गाजर दाखवत आंदोलने शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी अनेक पक्षाच्या सदस्यांनी आपल्यामुळेच हा रस्ता मंजूर झाला आहे अशा जाहिरात बाजी केल्या व उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या मनीप्रमाणे सर्वच आनंदाने हवेत नाचू लागले व आंदोलने शांत केली पण खड्डे भरण्यासाठी हे आंदोलन केले होते हे आंदोलनकर्ते विसरुनच गेले आता त्याच खड्ड्यातून प्रवाशांना ये जा करावी लागत असून त्यांच्या आंदोलनावर अधिकाऱ्यांनी पाणी फिरवले। मग भीती कुणाची कशाला या गाण्याच्या उक्तीप्रमाणे अधिकारी सध्या नाचत आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button