आपला जिल्हा

राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार

पुणे- राज्यात पुढील दोन मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळी झालेल्या संततधार मुसळधार पावसामुळे आणि गारपीटीमुळे राज्यातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये गारपीटीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. भारतीय हवामान विभागाने आज ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, ढगाळ वातावरण राहील असंही, हवामान विभागाने म्हटलं आहे. मुंबईत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला. मुंबईत पुढील ४८ तासांत राज्यात अनेक भागात वादळी वारे वाहू शकतात.

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, रायगड, बीड, सातारा जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा अंदाज आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असून वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत उकाडा जाणवत होता. या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button