आपला जिल्हा
राजिवलीतील शैलेश घाडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली गावातील शैलेश घाडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम सर यांच्या शिफारशीवरुन त्यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शैलेश घाडगे हे राजिवली ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा गावात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या कामाचा आलेख पाहता त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांची ही नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉग्रेस पदधिकारी व कार्यकर्ते आणि सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



