गडनदी धरणावर सुरक्षा उपाययोजना म्हणून सिसीटिव्ही बसवण्यात यावेत संतोष येडगे यांची मागणी.

संगमेश्वर – तालुक्यातील गडनदी धरण हे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजना आणि राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून उभारण्यात आला असून या प्रकल्पावर आतापर्यंत ९५१ कोटी रुपये खर्च झाला आहे. धरण बांधावर आणि परीसरात सुरक्षा उपाययोजना म्हणून सिसीटिव्ह बसवण्यात यावेत. या ठिकाणी धरण पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. धरण परीसरात सुरक्षा उपाययोजना म्हणून धरण क्षेत्र संपुर्ण सीसीटिव्ह कक्षेत आणने खुप गरजेचे असून जलसंपदा विभागाने या ठिकाणी तातडीने सिसीटिव्ही बसवावेत अशी मागणी खरी लोकजागृती चे संपादक आणि राजिवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच संतोष येडगे यांनी केली आहे.
गडनदी धरणाची लांबी ६०६ मीटर तर उंची ७२.७० मीटर.एवढी आहे. धरणाचा डावा कालवा २७ कि.मी. व उजवा कालवा ४७ कि.मी लांबीचा आहे. गडनदी धरणाची पाणीपातळी क्षमता १२१.८० मिटर एवढी आहे. ६६.३८७ एवढ्या क्षमतेचा उप पाणीसाठा होत असून एकूण पाणीसाठा क्षमता ६६.६९९ द.ल.घ. मी एवढी आहे.२०२३ च्या पावसाळ्यात गडनदी धरण क्षेत्रात एकूण १३७७ मि.मी एवढा पाऊस झाला होता.



