आपला जिल्हा

राजिवली ग्रामपंचायत सरपंच रिक्त जागेवर प्रशासकाची नेमणूक ; प्रशासक हिंदूराव गिरी यांच्याकडे राजिवली ग्रामपंचायतीचा कारभार

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी लाच स्विकारल्याने कोकण विभागीय आयुक्त यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३९ ( १ ) नुसार अपात्रतेची कारवाई करत पदावरुन काढून टाकले होते. एकाच वेळी सरपंच आणि उपसरपंच यांना लाच प्रकरणांत पदावरुन दूर व्हावे लागल्याने प्रशासनासमोर घटनात्मक पेच निर्माण झाला होता संगमेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी विभागीय कोकण आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३५ ( ९ ) नुसार निर्णय घेत विस्तार अधिकारी श्री. हिंदूराव गिरी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी त्यांचे नियमित कामकाज पाहून राजिवली ग्रामपंचायत कार्यालयाचा अतिरिक्त पदभार स्विकारत कामकाज पहावे असे आदेशात म्हटले आहे.

राजिवली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२२ रोजी पार पडली होती या निवडणूकीत थेट जनतेतून निवडूण आलेल्या सरपंचाने आणि उपसरपंचाचे ग्रामपंचायत कामाच्या बिलाची रक्कम सोडण्यासाठी ११ मे २०२३ रोजी प्रत्येकी १५ हजारांची लाच घेतली होती ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत विभागाने केली होती या कारवाईनंतर सरपंच आणि उपसरपंच यांना अटक होवून जामिनावर सुटका झाली होती मात्र तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने कोकण आयुक्त यांनी २६ सप्टेंबर २०२३ रोजी सुनावनी अंती सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांना पदावरुन काढून टाकणाचा निर्णय दिला होता. कोकण आयुक्तांच्या निर्णयाचे पालन करत रत्नागिरी जिल्हा परीषदेने राजिवली ग्रामपंचायत रिक्त झालेल्या जागेवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही पुर्ण केली आहे. रिक्त जागांमुळे राजिवली ग्रामपंचायत कारभार ठप्प होता. दिर्घ कालावधी नंतर राजिवली ग्रामपंचायत रिक्त जागेवर प्रशासकाची नेमणूक झाल्याने आता गावांच्या विकास कामाला गती मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button