आपला जिल्हा

केंद्र शासनाची “अमृत काल विमर्श विकसित भारत @2047” एक पथदर्शी योजना ; योजना शासन समाज आणि खाजगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नाने साकारण्यात येणार

मुंबई – स्वतंत्र भारताच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित आणि सर्वसमावेशक राष्ट्रात रूपांतरित करण्याकरता केंद्र शासनाकडून *”अमृत काल विमर्श विकसित भारत @2047″* एक पथदर्शी योजना राबवण्यात येत आहे . सदर योजना शासन समाज आणि खाजगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नाने साकारण्यात येणार आहे . अमृत काल विमर्श ही संपूर्ण देशात राबवली जाणारी व्याख्यान योजना शासन समाज आणि खाजगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नाने साकारण्यात येणार आहे माला असून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील मान्यवर विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना संबोधित करतात.. सदर योजने अंतर्गत AICTE, NCVETआणि DTE (MS) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ नोव्हेंबर 2023 रोजी विद्यालंकार संकुल सभागृह येथे डॉक्टर निर्मलजीत सिंग कलसी अध्यक्ष नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुंबई विभागातील अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालये , ITI विद्यालये आणि Vocational कोर्स चालवणार्‍या शाळा यांचे प्राचार्य, शिक्षक व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित होते.

डॉक्टर निर्मलजीत सिंग कलसी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क याबाबत सभेला मार्गदर्शन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक नियमांमधील तसेच प्रशासकीय व्यवस्था मधील बदलांबद्दल विश्लेषण दिले.

सर्वसमावेशक आणि समान गुणवत्तेचे सर्वांना निरंतर नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 निश्चितच 2047मध्ये विकसित भारत निर्माण करेल याबाबत त्यांनी आत्मविश्वास दर्शविला.

या कार्यक्रमास श्री विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग , डॉक्टर विनोद मोहितकर, संचालक तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य , डॉक्टर दिगंबर दळवी संचालक व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र राज्य, डॉक्टर सुहास देशमुख संचालक नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button