ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई भाजपा शिक्षक आघाडीतर्फे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धांचे अर्थात कला महोत्सवाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – विद्यार्थी आणि शिक्षकांमधील सर्जनशीलतेला, कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच आशय समृद्धीसाठी भारतीय जनता पार्टी – शिक्षक आघाडी मुंबईच्या वतीने मागील दोन वर्षांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदाही कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी चित्रकला स्पर्धा, समूह गीतगायन स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धा यांचे तर फक्त शिक्षकांसाठी स्वरचित काव्यवाचन आणि एकेरी नृत्य या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पाचवी ते आठवी, नववी ते बारावी आणि शिक्षक गट अशा तीन गटांमध्ये सदर स्पर्धा होणार आहे. कला महोत्सवामध्ये होणाऱ्या या सर्व स्पर्धा *ऑनलाइन* स्वरूपात घेण्यात येणार असून ज्या विद्यार्थी आणि शिक्षकांना या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी रविवार ; २४ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपले *स्पर्धा साहित्य ऑनलाइन स्वरूपात* स्पर्धा प्रमुखांकडे पाठवायचे आहे.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कला महोत्सवामध्ये हजारो स्पर्धक सहभागी होत असून प्रचंड मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येते. पुन्हा एकदा तोच जोश आणि तोच उत्साह घेऊन मुंबई भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे प्रमुख समन्वयक आणि भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू धोंडिबा बंडगर यांनी केले आहे.

सदर स्पर्धेचा अंतिम निकाल सोमवार ; दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.

सदर स्पर्धेची नियमावली आणि परिपत्रकासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे-

स्पर्धाप्रमुख —
डॉ. राजू धोंडिबा बंडगर – 9987130184

स्पर्धा सहसमन्वयक —
श्री. विरेंद्र नेवरेकर – 8369668751

=============================

टीप : सोबत स्पर्धेचे परिपत्रक पाठवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button