आपला जिल्हा
दारू पिऊन एस.टी. चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी – दारूच्या नशेत एस.टी. बस चालवणाऱ्या चालका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी स. ६.३० वा. रहाटाघर एसटी स्टँड येथे घडली. ज्ञानेश दिलीप सुर्वे (३१, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
त्याच्याविरोधात वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप शिवाजी पाटील (३४, रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवार १ सप्टेंबर रोजी ज्ञानेश सुर्वे आपले कर्तव्य बजावत असताना दारूच्या नशेत होता. त्याच अवस्थेत तो रत्नागिरी ते पावस जाणारी एसटी (एमएच १४ बीटी १२२६) चालवताना आढळून आल्यावर ही कारवाई करण्यात आली.
त्याच्याविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



