२७ जुलैच्या परीक्षेच्या नवीन तारखा ; अतिवृष्टीमुळे २७ जुलैच्या परीक्षा १,५, ८ व ११ ऑगस्ट रोजी होणार
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

पावसाच्या रेड अलर्टमुळे दिनांक २७ जुलै २०२३ रोजी होणाऱ्या १५ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या परीक्षा दिनांक १, ५, ८ व ११ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील.
दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212,4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
तृतीय वर्ष बीए सत्र ५ (3A00145 ), एमए सत्र १ (सीबीसीजीएस ) ( 3A00521), एमए सत्र १ (चॉईस बेस) (3A00531), एमकॉम सत्र ४ ( ६०:४०) (2C00554), एमएससी आयटी व एमएससी कॉम्प्युटर सायन्स (६०:४०) सत्र ४, एमएससी गणित (८०:२०) सत्र ४ (1S01154), एमसीए सत्र ३ ( 1T 00163) यांच्या परीक्षा ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
तसेच द्वितीय वर्ष बीबीए/ एलएलबी ( ५ वर्षीय कोर्स ) सत्र ३ व ४ ( प्रोग्राम क्रमांक 3L00413 & 3L00414) ही परीक्षा दिनांक ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
एमए / एमएससी & एमएससी रिसर्च सत्र १ ( प्रोग्राम क्रमांक 3A00521, 3A00531, 1S01111, 1S01121) ची परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.
अशा आशयाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी प्रसिद्ध केले आहे.



