आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजीत पवार गट) प्रदेश सरचिटणीस पदी अजित यशवंतराव

देवरुख - सुरेश सप्रे

सदरची नेमणुक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने झाली असून त्या नियुक्तीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी उपस्थित चिपळुणचे आम. शेखर निकम, रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाबजीराव जाधव, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे आदी उपस्थित होते.
मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू सुर्वे हे गेले दोन दिवस आम. शेखर निकम यांचे समवेत दिल्ली व मुंबई दौर्‍यात सहभागी झालेले दिसत असल्याने ते शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मधे जात असलेल्याच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे..

Related Articles

Leave a Reply

Back to top button