ताज्या घडामोडी

बाई पण भारी देवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये भव्य मंगळागौर स्पर्धा! नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांचेकडून आयोजन हजारो रुपयांची बक्षीसे आकर्षक ट्रॉफी प्रशस्तीपत्रके

चिपळूण - ओंकार रेळेकर

बाई पण भारी देवा या चित्रपटाने समस्त महिला वर्गाला पुन्हा एकवार भारतीय संस्कार- संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मंगळागौर या कार्यक्रमाकडे आकृष्ट केले. आता नेमका हाच धागा पकडून मा. नगराध्यक्षा सौ. सुरेखा नितीन खेराडे यांनी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

एखादी घटना, प्रसंग, मालिका व चित्रपटातील एखाद दृश्य हे आपल्याच संस्कार – संस्कृती ची नव्याने आठवण करून देते. आणि मग त्या साऱ्याकडे पुन्हा एकवार नव्याने पहावं अशी स्थिती निर्माण होते. मंगळागौर हे अशाच पैकी एक! श्रावण मासातील विविध सण उपक्रमांमध्ये मंगळागौर हा वर्षानुवर्षे चालू झालेला एक सण. गत काही दशकांमध्ये काहीशा मर्यादित झालेल्या या मंगळागौर सणाला पुन्हा एकवार सार्वत्रिक सहभागा चा मान मिळणार आहे.

मंगळागौर या सणातले विविध खेळ म्हणजे स्त्रियांचे आरोग्य, शारीरिक चापल्य, ताकद, कौशल्य अशा साऱ्याचेच प्रतीक ठरतात. बदलत्या काळातील वेगळ्या जीवनशैलीने या मंगळागौर सणातील या नृत्य खेळ प्रकाराकडे दुर्लक्ष झाले हे खरेच. पण, बाई पण भारी देवा या चित्रपटाने स्त्रियांच्या मनातील या साऱ्या सुप्त कलागुणांना पुन्हा एकवार नवी उर्मी ऊर्जा मिळाली आहे. आपण देखील असंच काही करू शकतो मात्र त्यासाठी संधी मिळायला हवी ही भावना दृगोचर झाली. महिलांमध्ये निर्माण झालेली हीच भावना यानिमित्ताने जपण्याचा विचार मनी मानसी घेऊन सौ. खेराडे यांनी भव्य अशा मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

महिलांचे भावविश्व जपत या सणासह त्यातील खेळ स्पर्धा आणि आनंददायी भावना जपण्यासाठी सणाला काहीसं स्पर्धात्मक स्वरूप देण्यात आल आहे हे विशेष!

या समूह स्पर्धेतील प्रथम विजेत्या गटाला 25000, द्वितीय 15000, तृतीय 11000 या या रोख बक्षीसांसह आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे याशिवाय व इतर उत्तेजनार्थ विविध बक्षिसे, प्रमाणपत्र, ट्रॉफी अशा साऱ्या बक्षीसांची लयलूट या मंगळागौर स्पर्धेत करता येणार आहे.

चिपळूण मध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये शहरासह तालुक्यातील महिलांना सहभागी होता येणार आहे. यासाठी नाव नोंदणी पुढील सुरेखा खेराडे ९१५६४६६८६८

स्कंदा चितळे ९०९६६५६६७२ व अर्चना बक्षी
क्रमांकावर व्हाट्सअप करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे महिलांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button