भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ; महाराष्ट्र ही भारतातील पहिली ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था :- अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ व ९ ॲाक्टोबर २०२५ रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन आणि मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी राजशिष्टाचार विभागाच्या प्रमुख म्हणून श्रीमती मनिषा पाटणकर – म्हैसकर , राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत व प्रस्थान या बाबत राजशिष्टार करण्याचे भाग्य लाभल्याचे श्रीमती मनिषा पाटणकर म्हैसकर यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर आपली पोस्ट करत हे भाग्य मिळाल्याचे म्हटले आहे.
श्रीमती मनिषा पाटणकर – म्हैसकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील २५ वर्षांच्या निःस्वार्थ राष्ट्राच्या सेवेला समर्पित केली असून त्यातील ११ वर्षे देशाचे पंतप्रधान तर १४ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केल्याचे कौतुक करण्यात आले आहे.
भारत आता अमृतकाळात बळकट होत चालला आहे. ७५ वर्षांच्या वयापासून १०० वर्षांच्या वयापर्यंत आणि २०४७ पर्यंत विकसित भारताकडे आपला प्रवास सुरू झाला आहे. या प्रवासादरम्यान भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल आणि महाराष्ट्र ही भारतातील पहिली ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असेल असा विश्वास अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर यांनी व्यक्त केला .या महत्त्वपूर्ण प्रवासाचा भाग होणे आणि राष्ट्र उभारणीत तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक भूमिकेत किंवा क्षमतेत, दृढनिश्चयाने, परिश्रमाने आणि शिस्तीने योगदान देणे हे नम्रतेचे असल्याचे यावेळी श्रीमती मनिषा पाटणकर – म्हैसकर म्हणाल्या.



