अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही – माजी आमदार रामहरी रुपनवर

नवी मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासात तोड नाही अहिल्यादेवी या मानवतेच्या समतेच्या पुरस्कर्त्या होत्या त्यांचे कार्य एका समाजापुरते नव्हते छत्रपती शिवरायांच्या नंतर तेवढ्याच तोला मोलाच राज्य करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या होत्या अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील पहिली सैनिकी महिलांची शाळा सुरू केली अशा या अहिल्यादेवी कर्तृत्व इतिहासामध्ये तोड नाही असे प्रतिपादन माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने नवी मुंबई येथे १४० महिलांचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पुरस्कार समारंभात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वासराव मोटे कृगर व्हेंटिलेशन कंपनी चे जनरल मॅनेजर संपतराव शेडगे म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी शंकरराव विरकर व ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सोमनाथ कर्णवर हे होते.
अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा आयोजित करून महिलांना ऊर्जा व प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मोठे योगदान आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये एवढा मोठा महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करून महिलांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली.
यावेळी विश्वासराव मोटे मुंबई महानगरपालिका उपायुक्त ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव बीडी मोटे .मा मनीष लाबोर गोवा प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ. सोमनाथ कार्यावर पोलीस इन्स्पेक्टर ठाणे अशोकराव मोटे उद्योगपती मुंबई संजय वाघमोडे वनविभागाचे अधिकारी कुर्ला बँकेचे संचालक बाळासाहेब पुकळे यांची भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूमी अभिलेख अधिकारी उल्हासराव वाघमोडे सिडकोचे अधिकारी नितीन विरकर हर्ष लॉजिस्टिक कंपनीचे चेअरमन सचिन बुरुंगले प्रकाश पारटेअक्षय जानकर आदित्य वाघमोडे दयानंद ताटे रामचंद्र पोकळे आनंदराव कचरे अक्षय चोपडे शिवाजीराव दातीर जगन्नाथ काकडे शरद काकडे नितीन काकडे अभिषेक शिंदे अण्णासाहेब वावरे नानासाहेब वाघमोडे शंकरराव कोळेकर मिलिंद मोटे लक्ष्मण गोरड विकास जानकर प्रमेश झंजे भास्कर यमगर नयन सिद नानासाहेब मगदूम राजाराम गोरे संजय गोरड पिराजी गोरड मारुती गोरड ओंकार कुचेकर राजाराम हुलवान वामन भानुसे शहाजी पाटील नवनाथ बिडगर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला



