आपला जिल्हा

कुंकू पाठवून महिलांचा पंतप्रधानांना इशारा : ‘माझं कुंकू, माझा देश’

चिपळूण : ‘माझं कुंकू, माझा देश’ या घोषणांनी आज चिपळूण शहर दुमदुमून गेला. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असतानाही केंद्र सरकार त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी देत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या आदेशानुसार महिला आघाडीने चिपळूण येथे जोरदार आंदोलन केले.

महिला आघाडी उपजिल्हा संघटक व माजी सभापती धनश्री रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पार पडले. यावेळी क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, महिला शहर प्रमुख वैशाली मनोज शिंदे, युवासेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहर प्रमुख संजय रेडीज, राजन खेडेकर, संकेत शिंदे, युवासेना सचिव प्रतीक शिंदे, महिला शहर संघटक श्रद्धा शिवाजी घाडगे, महिला उपशहर संघटक हर्षाली संदेश पवार, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे आदींसह अमोल टाकळे, गणेश खेतले, अथर्व चव्हाण, सुधीर जाधव, जियात चिकटे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनात साक्षी संजय गोटल, सृष्टी सचिन गोटल, जान्हवी संतोष भुवड, सिद्धी अंकुश पालकर, अनुश्री स्वप्नील वारणकर, संचिता सतीश गोटल, अश्विनी अशोक गोटल, शर्मिला सीताराम गावडे, संगीता तुकाराम वारणकर, दर्शना दत्ताराम पालकर, ललिता लक्ष्मण भुवड, रश्मी रमेश पालकर, कुसुम नरसिंह भुवड, सुभद्रा सुभाष गावडे, जयश्री महादेव गोटल, अर्चना अनंत सकपाळ, सरस्वती विष्णू झुजम, अनुसया सखाराम झुजम, मानवी गणेश झुजम, नेहा निलेश लांबे या अलोरे जिल्हा परिषद गटातील व शहरातील बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

“भारताचा सैनिक अमर राहो… शहीदांचा अपमान चालणार नाही… पाकिस्तानशी क्रिकेट अजिबात नाही… शब्दाने नाही, तर कृतीतून देशभक्ती दाखवा… पाकिस्तानशी नातं तोडा…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेनं माननीय पंतप्रधानांना कुंकू पाठवून ‘माझं कुंकू – माझा देश’ (हमारा सिंदूर – हमारा देश) ही जाणीव करून दिली. या आंदोलनातून केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात महिलांचा संताप स्पष्टपणे व्यक्त झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button