आपला जिल्हा
धामापुर पंचायत समिती गणात ऋण फाऊंडेशन तर्फे विधवा निराधार महिलांना दिवाळी भेट

संगमेश्वर – जनतेचे काही तरी ऋण आपल्यावर आहेत तेचं ऋण घेऊन आपणं देखील समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे ह्याचं भावनेतून स्थापन झालेले ऋण फाउंडेशन अनेक छोटे मोठे उपक्रम राबवत आहे.
आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, ऋण फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती.अंकिता ताई चव्हाण यांच्या माध्यमातून धामापूर पंचायत समिती गणात विधवा गरजू निराधार महिलांना दिवाळी भेट च्या माध्यमातून १ साडी व फराळ वाटप करण्यात आला. पंचायत समिती गणातील एकूण ९६ महिलांना हे वाटप करण्यात आले.



