ताज्या घडामोडी

उदय सामंत यांनी फुंकले मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग

उबाठा गटाच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई :- आनंद नगर, सांताक्रूझ येथे विभाग क्रमांक ७ मध्ये सत्कार सोहळ्याचे आणि शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत हजारो उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

यावेळी शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी मुंबई महानगर पालिकेच रणशिंग फुंकले असून त्यांच्या उपस्थितीत उबाठा गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी उदय सामंत म्हणाले की,” विधानसभा निवडणुकीच नेतृत्व हे शिंदे साहेबांनी केलं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात राज्यभरात मोठ्याप्रमाणात यश मिळालं असल्याचं सांगत कोकणातील १५ पैकी १४ जागेवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असल्याचं सांगितलं. यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचा भगवा फडकणार असल्याचं आश्वासन दिलं.

याप्रसंगी विभाग प्रमुख श्री कुणाल सरमळकर, विभाग क्र. ७ महिला विभाग प्रमुख सौ. भक्ती भोसले, माजी नगरसेवक श्री. सुभाष कांता सावंत, माजी नगरसेवक सौ. स्नेहल सुहास शिंदे,
माजी नगरसेवक श्री. विलास चावरी,
माजी नगरसेवक श्री. संजय अगलदरे यांसह शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button