ताज्या घडामोडी

राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार किरण ( भैय्या ) सामंत यांचा १५ रोजी मुंबईत नागरी सत्कार

संगमेश्वर :- राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघातून किरण ( भैया ) सामंत यांनी शिवसेना ( उबाठा ) गटाचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव करत विजय मिळवल्याने नवनिर्वाचीत आमदार किरण ( भैय्या ) सामंत यांचा ऋणानुबंध सामाजिक संस्था आणि दादा येडगे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता सेंट्रल रेल्वे इंस्टिट्यूट मुख्य हॅाल दादर मुंबई या ठिकाणी नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. या सत्कार सोहळ्याला समाजातील सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री. तुकाराम ( दादा ) येडगे यांनी केले आहे.

राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे किरण सामंत यांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा १९९७४ मतांनी पराभव केला. राजन साळवी यांना पराभूत करून किरण सामंत यांनी कोकणात उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेला हा मोठा धक्का आहे. राज्यात व कोकणातील जनतेने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला असून त्याचे फलीत म्हणून राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पदरात पडलेले मताधिक्य आहे. राजापूर मतदारसंघात किरण सामंत यांना 80256 मते मिळाली तर ठाकरे गटाचे राजन साळवी यांना 60579 मते मिळाली. कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांना 7945 मते मिळाली.

राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार किरण सामंत यांच्या निवडणुकीत राजापूर, लांजा तालुक्यातील सर्व धर्मीय समाज ताकदीने मैदानात उतरला होता. शाहीर विकास लांबोरे, तुकाराम येडगे यांच्यासह सर्व समजातील तरुण पदाधिका-यांनी कंबर कसत सुक्ष्म नियोजन करुन किरण सामंत यांच्या विजयात चांगली मदत केली. किरण सामंत यांच्या विजयासाठी प्रचारात काम केलेल्या पदाधिका-यांनी आमदार किरण सामंत यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन केले आहे.या कार्यक्रमाला मुंबईकर चाकरमानी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तुकाराम येडगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button