आपला जिल्हा

अमोल येडगे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नवे आयुक्त

मुंबई – राज्य सरकारने नुकतीच २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत श्री. अमोल येडगे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जबाबदारी देत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त पदी त्यांची बदली करण्यात आली आहे.

अमोल येडगे यांनी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे

जानेवारी २०२४ मध्ये त्यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आणि त्यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारला होता. कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केल्याने राज्य शासनाच्या वतीने त्यांना सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते. नुकताच मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशासकीय उत्तम सेवा देण्याचा अधिका-यांचा सन्मान करण्यात आला होता त्या सन्मान सोहळ्यात अमोल येडगे यांचा गौरव करण्यात आला होता.

कोल्हापूरला येण्यापूर्वी ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (MSCERT) संचालक म्हणून कार्यरत होते.

अमोल येडगे यांनी२०२१ च्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले आहे.

अमोल येडगे यांनी माहिती तंत्रज्ञान (IT) प्रकल्पाचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button