आपला जिल्हा

जी. श्रीकांत यांची जलजीवन मिशन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती; जलजीवन मिशन ला मिळणार नव संजीवनी.

नवी मुंबई – जी. श्रीकांत (G. Sreekanth) हे २००९ बॅचचे महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी आहेत, जे प्रशासकीय कारभारात कडक शिस्त आणि लोकाभिमुख कामासाठी ओळखले जातात.त्यांची बदली जलजीवन मिशन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याने रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जी. श्रीकांत हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. शहरातील विकास आराखडा यशस्वीपणे राबविण्यात त्यांना यश मिळाले होते. सर्व समावेशक कार्यभार ही त्यांची जमेची बाजू होती.

जी. श्रीकांत यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बी.कॉम (B.Com) पदवी प्राप्त केली आहे.

जी श्रीकांत यांनी कोरोना काळात लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून उत्तम काम केले होते. जलव्यवस्थापन कार्यात त्यांचा गाढा अनुभव असून लातूर मधील दुष्काळी भागात त्यांनी पाणी व्यवस्थापन विषयावर चांगले काम केले होते.

जी. श्रीकांत यांची जल जीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याने आता जलजीवन मिशन योजनेची रखडलेली कामे मार्गी लावण्यात ते यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

जी श्रीकांत हे कडक प्रशासक म्हणून ओळखले जातात, त्यांनी संभाजीनगरमध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध (अतिक्रमण) कडक कारवाई केली होती.
अकोला जिल्हाधिकारी असताना त्यांना शासनाकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते.

त्यांना प्रामुख्याने त्यांच्या कामाच्या पारदर्शक पद्धती आणि शहराच्या विकासाच्या कामांसाठी ओळखले जाते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button