राजापूर तालुक्यात विकासाच्या माध्यमातून परिवर्तन करू:- किरण सामंत
प्रतिनिधी - कृष्णा कोलापटे

राजापूर – दि.२८ सप्टेंबर – तालुक्यातील वाटूळ गावात राज्याचे सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत गाव भेट कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गाव भेट कार्यक्रमादरम्यान किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाटुळ गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी ‘ किरण सामंत हे गोरगरीबाचे नेतृत्व आहे आणि त्यांच्या बाजूने उभे राहणे ही आपली जबादारी असल्याचे मत सरपंच निता चव्हाण यांनी व्यक्त केल. किरण सामंत यांच्या माध्यमातून वाटूळ गावात खऱ्या अर्थाने विकासाला सुरवात झाली असून भविष्यात गावात काम शिल्लक राहणार नाही असे त्या म्हणाल्या.
या गावभेटी दरम्यान किरण सामंत म्हणाले की राजापूरच्या विकासाची जबादारीपासून ही महायुती सरकारची आहे. त्यामुळे जो जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करून देण्याची जबबदारी किरण सामंत म्हणून माझी असणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. ते पुढे म्हणाले की “तुम्ही मला जी कामे दिली त्या पैकी काही कामे सुरू झाली आहेत तर काही कामाना निधी दिला आहे ती ही कामे लवकरच सुरू होतील. विकास करणे ही लोकप्रतनिधींची जबादारी आहे. आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या मी तुमच्या सोबत आहे. जेव्हा गरज लागेल तेव्हा थेट फोन करा तुमचा किरण सामंत तुमच्या साठी २४ तास उपलब्ध असे असा शब्द यावेळी किरण सामंत यांनी दिला.



