आपला जिल्हा

जिल्हापरिषद सदस्य संतोष थेराडे यांची महत्वाच्या आरोग्य समितीत निवड

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटातून प्रथमच निवडून आलेल्या संतोष थेराडे यांची थेट रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अत्यंत महत्वाच्या अशा आरोग्य समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.मंगळवारी आरोग्य समितीचे गठन करण्यात आले,यावेळी पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा तसेच सर्व समिती सभापती त्यांच्या बरोबर सदस्य म्हणून संतोष थेराडे यांना संधी देण्यात आली असून यानिमित्ताने कडवई जिल्हा परिषद गटाला हा बहुमान देण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत कडवई जिल्हापरिषद गटातून संतोष थेराडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून *मशाल * या चिन्हावर निवडणूक लढवली होती.राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या या गटातील निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.परंतु अतिशय चुरशीच्या या निवडणुकीत संतोष थेराडे यांनी दणदणीत विजय प्राप्त करत रत्नागिरी जिल्हापरिषदेत दिमाखदार प्रवेश केला आणि आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे.

जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून येताच काही दिवसांतच त्यांनी कामाला सुरुवात केली. कडवई जिल्हापरिषद गटातील प्रलंबित असलेल्या कामाकडे लक्ष केंद्रित करून त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देखील दिलेल्या आहेत.

सामाजिक प्रश्नांची जाण, प्रशासकीय कामाची माहिती तसेच उच्चशिक्षित आणि आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी अल्पवधीतच आपली छाप पाडली होती.सहाजिकच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना थेट महत्वाच्या आरोग्य समितीवर
संधी देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव दिला आहे.

जिल्हापरिषदेची आरोग्य समिती जिल्हापरिषद अध्यक्ष या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर सर्व समित्यांचे सभापती सदस्य म्हणून निवडले जातात,तसेच जिल्हापरिषद सदस्यांमधून निमंत्रित सदस्य म्हणून काही मोजके सदस्य घेतले जातात त्यामध्ये संतोष थेराडे यांना संधी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला आरोग्य समितीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे.अध्यक्ष व सर्व सभापतींच्या नेतृत्वा खाली आरोग्य समितीमध्ये उत्तम आणि अभ्यासू काम करून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवू असे श्री.संतोष थेराडे यावेळी म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Back to top button