प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित.
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वंचित घटकातील डोंगरी व दुर्गम भागातील जंगलातील व नुकसान झालेल्या व दरडग्रस्त अतिवृष्टी झालेल्या भागातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सातत्याने प्रयत्न केला म्हणून सिनेअर्कप्रोडक्शन मुंबई च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल, पुणे येथे राष्ट्रपती पदक विजेते श्री.पठाण उपायुक्त पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते व सिनेअर्क प्रोडक्शन चे चेअरमन विनोद खैरे व ज्ञानेश्वर मोळक अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयदेव जाधव यांचे शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री प्रवीण काकडे यांनी ४४९३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले काहींना शैक्षणिक फी भरून सहकार्य केले समाज प्रबोधन व जनजागृती अभियान राबवून समाज जागृत करण्याचे काम सुरु असून सातत्याने प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम सुरू घेत आहेत. नोकरी करत करत प्रत्येक सुट्टीच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्शवत कामगिरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. म्हणून त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. प्रवीण काकडे यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सातारा,सांगली, सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, पुणे या सारख्या जिल्ह्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव जंगलातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना मोलाचे सहकार्य करून समाजावर एक चांगला आदर्श निर्माण करून दिल्याचे प्रतिपादन पुणे महानगर पालिका उपयुक्त युसुफ पठाण यांनी केले



