आपला जिल्हा

संगमेश्वर – पाटण घाटमार्गाचा आवाज विधानसभेत घुमणार ; आमदार शेखर निकम यांचा पुढाकार

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्याला पश्चिम महाराष्ट्रासोबत जोडण्यासाठी संगमेश्वर – संगमेश्वर पाटण घाटमार्ग वरदान ठरणार असून या घाटमार्गामुळे संगमेश्वर बाजारपेठेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. येथील जनतेची मागणी लक्षात घेवून या घाटमार्गासाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम आग्रही असून येत्या पावसाळी अधिवेशनात या घाटमार्गाचा आवाज विधानसभेत उठविणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले तर या घाटमार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शेखर निकम बोलले.

संगमेश्वर ते चाफेर ( पाटण ) हा एकूण ४६.६०० कि.मी चा रस्ता आहे यापैकी २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी अंतरामधील रस्ता शिल्लक आहे.

संगमेश्वर – पाटण घाटमार्ग डीपीआर साठी महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी २०१८ या अर्थसंकल्पीय वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. डीपीआर साठी तरतूद केलेल्या निधीसाठी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

संगमेश्वर पासून सुरु होणा-या या घाटमार्गाचा कोसुंब,करंबेळे, वाशी,धामणी ,तुरळ, आरवली, कसबा, कारभाटले, नायरी, अणदेरी, मासरंग , चिखली, तांबेडी, शेनवडे, शेंबवणे, कडवई, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, कुटगिरी, रातांबी, कोंडीवरे, माखजन, करजुवे, असुर्डे,नांदगाव, येगांव, कुटरे, तळवडे, गोवळ, पाथे, आदी आणि खाडीपट्ट्यातील, सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या असंख्य गावे आणि परीसरातील गावांमधील लाखो नागरीकांना या मार्गाचा फायदा होणार असून पुणे, सातारा या ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग जवळचा ठरणार आहे हा रस्ता पुर्ण झाल्याने वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button