आपला जिल्हा

गडनदी धरणावर सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटिव्ही कॅमेरे ; मुख्य अभियंता मिलींद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी.

खरी लोकजागृती चे मुख्य संपादक संतोष येडगे यांच्या मागणीला यश.

संगमेश्वर – तालुक्यातील गडनदी धरण हे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सिंचन योजना आणि राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून उभारण्यात आला असून या प्रकल्पावर आतापर्यंत ९५१ कोटी रुपये खर्च झाला आहे. धरण बांधावर आणि परीसरात सुरक्षा उपाययोजना म्हणून सिसीटिव्ह बसवण्यात यावेत अशी मागणी खरी लोकजागृती चे मुख्य संपादक तथा राजिवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच संतोष येडगे यांनी जलसंपदा विभागाकडे केली होती. संतोष येडगे यांनी जलसपंदा विभागाचे लक्ष वेधत ही बाब निदर्शनास आणून दिली होती त्या मागणीचा विचार करत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिलींद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर गडनदी धरणावर चार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कॅमेरे बसवल्याने धरणावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे.

गडनदी धरण पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गडनदी धरण परीसरात सुरक्षा उपाययोजना म्हणून धरण क्षेत्र संपुर्ण सीसीटिव्ह कक्षेत आणने खुप महत्वाचे होते. जलसंपदा विभागाने या ठिकाणी तातडीने सिसीटिव्ही बसवून मागणीचा विचार केल्याने संतोष येडगे यांनी जलसपंदा विभागाचे कोकण प्रदेश मुख्य अभियंता मिलिंद नाईक, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, उप विभागीय अभियंता श्री. इनामदार , अभीजीत कदम आणि इतर अधिकारी आणि कर्मचा-यांचे आभार मानले.

गडनदी धरणाची लांबी ६०६ मीटर तर उंची ७२.७० मीटर.एवढी आहे. धरणाचा डावा कालवा २७ कि.मी. व उजवा कालवा ४७ कि.मी लांबीचा आहे. गडनदी धरणाची पाणीपातळी क्षमता १२१.८० मिटर एवढी आहे. ६६.३८७ एवढ्या क्षमतेचा उप पाणीसाठा होत असून एकूण पाणीसाठा क्षमता ६६.६९९ द.ल.घ. मी एवढी आहे.२०२३ च्या पावसाळ्यात गडनदी धरण क्षेत्रात एकूण १३७७ मि.मी एवढा पाऊस झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button