आपला जिल्हा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणाला सुमारे 2 हजार कोटींच्या कामांना मंजुरी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

रत्नागिरी – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणाला जवळपास 2 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील जालगाव येथे अर्थसंकल्प/पुरवणी अर्थसंकल्पामधील मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केदार साठे, संजय सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, जिल्हयाला शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजना आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या शासनाच्या काळात सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यादृष्टीने विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी हाती घेण्यात आले आहेत. आंबेत पुलाची दुरुस्ती यासारखी जी कामे प्रलंबित होती, त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. अर्थसंकल्पामध्ये कामाचा स्कोप बघून आवश्यक त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button