संगमेश्वर – पाटण घाटमार्गामुळे संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, पाटण तालुक्यांतील ४ लाख जनतेला थेट फायदा ; सातारा चे खासदार श्रीनिवास पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र.

संगमेश्वर – मुंबईसारख्या महानगरात विविध रस्ते व उड्डाणपूल तयार करून तसेच मेट्रोचे जाळे पसरवून चार चार तासाचे अंतर केवळ अर्ध्या तासावर आणण्याचा शासनाने मुंबई ठिकाणी प्रयत्न केला त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. समृद्धी महामार्ग सुद्धा तयार करून दळणवळण सुरू केले त्याचप्रमाणे संगमेश्वर पाटण हा मधला रस्ता शासनाने केल्यास नक्कीच या तिन्ही जिल्ह्याचा व्यापार वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात व्यापारी आपल्या भाजीपाला व इतर वस्तू घेऊन जातील तर कोकणातील आंबा काजू ही पीक व्यापारी घेऊन येतील त्यामुळे कोकणातील व पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठ वाढून येथील शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला दर मिळेलच पण बाजारात सुद्धा करोडो रुपयांची उलाढाल होणार आहे त्यामुळे शासनाने संगमेश्वर ते पाटण या मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा सध्या सातारा जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय जवळचे विश्वासू मानणारे मंत्री सध्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत त्यांच्याच मतदारसंघातून हा रस्ता होणार असल्यामुळे याचा फायदा नक्कीच पाटण तालुक्यातील जनतेला होणार आहे त्या दृष्टीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात योग्य तो निर्णय घेऊन या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संगमेश्वर सह पाटण तालुक्यातील जनतेच्या वतीने होत आहे या अगोदरच खासदार श्रीनिवास पाटील यांनी नितीन गडकरींना निवेदन दिलेले आहेत त्याचप्रमाणे संगमेश्वर येथील सुद्धा नागरिकांनी जोरदार सयाजी मोहीम करून या रस्त्यासाठी आग्रह धरला आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल अशी अपेक्षा संगमेश्वर,चिपळूण,रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील जनतेला आहे.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग व्हावा म्हणून चिपळूण चे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे तर सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी सा.बां विभागाचे रत्नागिरी उत्तर चे कार्यकारी अभियंता यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना केला आहेत. संगमेश्वर – पाटण घाटमार्ग हा ऐनवेळी निवडणुकीचा मुद्दा तयार केला जातो आणि निवडणूकीच्या आचारसंहीता काळात सभा घेवून फक्त आश्वासन देवून बोळवण केली जाते या घाटमार्गासाठी आश्वासन न देता थेट कार्यवाही करण्यासाठी पुढाकाराची गरज असून यापुढील काळात चार तालुक्यातील जनता सजगतेने या विषयासाठी सरसावली असून निवडणुकपुर्वी संगमेश्वर – पाटण घाटमार्गाचा कामाला गती मिळाली अशी मागणी चार तालुक्यातील जनतेची आहे.



