आपला जिल्हा

“भाजपा नेत्या सौ. उल्का विश्वासराव यांच्या माध्यमातून राजापूर विधानसभेत भरघोस विकासनिधी”

नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण, लवकरच उर्वरित कामांसाठी मोठा निधी आणण्याचा व्यक्त केला विश्वास.

राजापूर – प्रसिद्ध उद्योजिका, भाजपा नेत्या व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव* यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राजापूर विधानसभेत तब्बल १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल सौ. उल्का विश्वासराव यांनी भाजपा नेते तथा सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत.

नागरिकांना म्हणाव्या तशा मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे आजही अनेक भागांत दैनंदिन जीवनात संघर्ष करावा लागत आहे. मात्र नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी कामे दिली त्यापैकी काही कामांना आता मंजुरी मिळाली असून लवकरच त्यांचा शुभारंभ आणि लोकार्पणही होईल. त्याचप्रमाणे इतर उर्वरित कामेही क्रमशः मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करण्यास मी कटिबद्ध आहे.” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

नवीन कामे मंजूर होऊन आल्यामुळे नागरिकांमध्ये आशेचा नवा किरण जागृत झाला असल्याची भावना निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे मूलभूत सुविधांसाठी शासनस्तरावर झगडणाऱ्या येथील नागरिकांमध्ये या जाहीर झालेल्या विकासकामांमुळे उभारी मिळालीअसून उर्वरित कामेही मार्गी लागतील असा विश्वास निर्माण झाला आहे. अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे सौ. उल्का विश्वासराव यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button