आपला जिल्हा

महामार्ग विभागाकडून पाटबंधारेची फसवणूक ? जनतेचे काय ?? महामार्ग विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा प्रकल्पग्रस्त, पाटबंधारे विभागातील महीलांना फटका.

चिपळूण – तालुक्यातील कापसाळ येथील पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जाणा-या पोहोच रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी फक्त खडी टाकून ठेवल्याने त्या रस्त्यावर घसरुन महीला आणि इतर कर्मचा-यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुचाकी घसरुन नागरीक जखमी होत आहेत मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असून या अक्षम्य कारभाराबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी ,कर्मचारी तसेच कार्यालयात येणारे प्रकल्पग्रस्त तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

मुंबई – गोवा महामार्ग होण्यापुर्वी कापसाळ पाटबंधारे वसाहतीत महामार्गालगत पाटबंधारे विभागाच्या जमिनीत अनेक झाडे होती महामार्ग संपादनात जमिन मोफत घेतली मात्र त्या जमिनीत असलेल्या झाडांचे मुल्यांकन करत त्या झाडांचा मोबदला पाटबंघारे विभागाला देणे व्यवहार्य असताना देखील त्या झाडांचा कोणताही मोबदला अद्याप दिलेला नाही तर महामार्गालगत असलेल्या पाटबंधारे कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी संरक्षण भींत बांधून देण्याची जबाबदारी महामार्ग विभागाची होती. पबंधारे विभागाकडे तांत्रिक टीम असताना संरक्षण भींतीचे कामाचा निधी त्या कार्यालयाकडे वर्ग करणे आवश्यक असताना कार्यालयासाठी महामार्ग विभागाने बांधलेली संरक्षण भिंत धोकादायक स्थितीत सोडून महामार्ग विभाग निद्रावस्थेत बसले आहे. या ठिकाणी महावितरण चे ट्रान्सफर सह उच्चदाबाची विद्युतवाहीनी असून अर्धवट संरक्षण भिंतीमुळे येथील विद्युत वाहिनी पडून कर्मचारी आणि कार्यालयात येणा-या प्रकल्पग्रस्तांचा बळी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील कर्मचारी आणि प्रकल्पग्रस्तांचा बळी घेतल्यावरच महामार्ग विभागाला जाग येणार आहे का असा सवाल आता जनता विचारु लागली आहे.

मुंबई – गोवा महामार्गालगत असलेल्या पाटबंघारे कार्यालयात येणा-या महीला कर्मचारी दुचाकीवरून पडून जखमी होत महीला दिनाचा सन्मान राखून तरी महिलांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्ग पुढाकार घेणार का असा सवाल विचारला जात आहे.

 

महामार्ग विभागाने अर्धवट ठेवलेल्या संरक्षण भिंतीचे काम पुर्ण करुन महीलांसाठी जीव घेणे ठरणा-या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे जाणा-या पोहोच रस्त्याचे डांबरीकरण काम तातडीने करावे अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button