आपला जिल्हा

सिंधुरत्न समृध्द योजना कार्यालयाचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी – पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुरत्न समृध्द योजना कार्यालयाचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत यांच्या हस्ते फित कापून आज उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील या कार्यालयाच्या कोनशिलेचेही आनावरण सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे विशेष निमंत्रित माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button