चिपळूण संगमेश्वर मतदार संघात राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात
ओझरे जिल्हा परिषद गट बेलारी गावामधील सापतेवाडी ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश

संगमेश्वर :- चिपळूण संगमेश्वर मतदार संघात गेले काही दिवस राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात सुरु आहे.
आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गावा -गावातील इतर पक्षातील लोक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील बेलारी सापतेवाडीतील ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांची भेट घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रवेश करणा-यांची नावे- अभिषेक मांडवकर, श्वेता मांडवकर, सुनिता मांडवकर, राजाराम मांडवकर, सदानंद मांडवकर, रोहित मांडवकर, शांताराम मांडवकर, सुवर्णा मांडवकर, दत्ताराम शेलार, सुजाता शेलार इ..
आमदार शेखर निकम यांनी बेलारी सापतेवाडी ग्रामस्थांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले त्यासर्वांशी संवाद साधला, गाव विकासाबाबत चर्चा केली. विकास निधीबाबत निश्चिंत राहून पक्ष वाढीच्या कामाला लागा माझे प्रत्येक चांगल्या कामात आपणास सहकार्य असेल असा शब्द दिला.
यावेळी नितीन भोसले, मंगेश बांडागळे, बाळशेठ पंदेरे, ओमकार गायकवाड इ. पदाधिकारी उपस्थित होते.



